Monday, April 11, 2011

सुभेदार मेजर विष्णु सखाराम परुळेकर

 ब्रिटीश शासनाच्या काळात आपल्या समाजाने खऱ्या अर्थाने उभारी घेतली. त्यात परुळेकर कुटुंबीयही मागे नव्हते. विष्णु सखाराम परुळेकर हे ब्रिटीश रॉयल मिलीटरी मध्ये सुभेदार मेजर झाले. वेंगुर्ल्यात ते सुभेदार परुळेकर या नावानेच परिचित होते.  सुभेदार उंचपुरे, धिप्पाड शरीराचे होते, काळेभोर आणि पाणीदार डोळे, उग्र चेहेरा याच बरोबर मितभाषी होते. पण गरज असेल तेव्हा रोखठोक बोलायचे.  सुमारे 100 वर्षांपुर्वी सुभेदार  विष्णु सखाराम परुळेकर यांनी मठ पाडलोस क्षेत्रात घर बांधले. त्यांना 13 अपत्ये होती. डॉ.रामचंद्र, गंगाधर, चंद्रकांता, श्रीधर, नीळकंठ, काशीनाथ, दुर्गा, मुक्ता, हीरा, विश्वनाथ, वामन, राजाराम आणि  भालचंद्र.

त्यांच्या शौर्याचे किस्से जुनेपुराणे लोक सांगायचे. ते बऱ्याचवेळा घोड्यावरून फेरफटका मारायचे. त्यांची रत्नजडीत तलवार आणि इतर अस्त्रे आज कुठे आहेत याची कोणालाच कल्पना नाही. त्यांनी सर्वच समाजाच्या अनेक गरीब लोकांना मदत केली. एका गरीबाची जमीन लिलावात घेऊन ती त्यालाच परत केली. त्यांनी अनेकांना आर्थिक मदत केली. गावात आणि शेजारच्या गावात त्यांनी अनेक नवीन जमिनी विकत घेतल्या. नंतर बऱ्याच जमिनी कुळ कायद्याने कुळाकडे गेल्या. त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखुन आपल्या मुला मुलींना उच्च शिक्षण दिले. त्यांच्या कर्तृत्वामुळेच आज परुळेकर कुटुंबाला चांगले दिवस दिसले. त्यांनी केलेल कार्य विसरण्याजोग नाही. गरज आहे ती त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून प्रगती करण्याची आणि  उंच भरारी घेण्याची.    

3 comments:

Anonymous said...

I like my surname
Parulekar

Waman Parulekar said...

me too

13CIH said...

हे सुभेदार मेजर कोणत्या पलटण मध्ये होते? आणि इटली मध्ये मोटे कॅसिनो लढाईत होते का?
उत्तर मिळाल्यास आनंद होईल.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...