Thursday, April 14, 2011

कुलाचार आणि कुलदेवता

कुलदेवता 

आपले परुळेकर परुळे येथिल श्री रवळनाथाला  आपली कुलदेवता मानतात. अर्थात हा श्रद्धेचा भाग आहे. कुलदेवतेच दर्शन हा कुलाचार मानला जातो. परुळे हे निसर्गसौदर्याने  नटलेलं गाव मठ गावापासून ३० किमी  अंतरावर समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं आहे. माड आणि पोफळी हे या गावाचे वैशिष्टय आहे. सुमारे दोनशे वर्षापूर्वी आपले पूर्वज परुळे या गावातून मठ या गावात स्थायिक झाले. किल्लेदार परुळेकर यांना मुळ वंशज मानले जाते. जे लोक मठात आले त्यांनी परुळेची आठवण म्हणून एक श्रीफळ मठात पूजेस ठेवले. त्याला मठातील परुळेकर मूळपुरुष कुलदेवता मानतात. आज कुलदेवतेच एक छोटस मंदिर मठ गावात परुळेकर कुटुंबियांनी उभे केले आहे. या मंदिरात वार्षिक होम-हवन आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात. 

कुलाचार  

कुलाचार म्हणजे गेली  अनेक वर्षे चालू असलेल्या धार्मिक परंपरा. आश्विन महिन्यातील नवरात्रात नऊ दिवस अखंडदीप ठेवणे हा कुलाचार अजूनही काही कुटुंबात चालू आहे. सुवासिनी ब्राह्मण भोजनास सांगणे हा कुलाचार मठ (पाड्लोस) मधील कुटुंबातून चालू आहे. दरवर्षी राधाकृष्ण परुळेकर आणि मनोहर परुळेकर हे पाड्लोस येथिल मूळपुरुष वृक्षाकडे ब्राह्मण भोजन करवितात. मंगलप्रसंगी ओटी भरणे हाही कुलाचार आहे. घरातील मुख्य स्त्री  आणि तीन सुवासिनी व एक कुमारिका या सर्व मिळून देवीची पूजा करतात. नंतर सुवासिनींची ओटी भरली जाते. कुटुंबाची वृद्धी व्हावी हाच या कुलाचारामागील हेतू आहे.


देवदिवाळीला किंवा सोयीस्कर होईल त्यावेळी ग्रामदेवता आणि कुलदेवतेला नैवेद्य दाखवणे हा तिसरा कुलाचार आहे. आजही आम्ही परुळे येथिल देवतांना नैवेद्य दाखवतो. परुळे येथिल राउळ हे आमच्यावतीने नैवेद्य तयार करतात. मुख्य देवतांचे नैवेद्य स्वतंत्र केळीच्या पानावर वाढले जातात. वडे-वाटण्याची आमटी-डाळ-भात असा नैवेद्य असतो. ह्या कुलाचारामुळे निदान वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेचे स्मरण होते. हाच या कुलाचारांचा मूळ हेतू आहे. सर्व परुळेकर कुटुंब जमेल तसे कुलाचार पाळतात.

       

2 comments:

Anonymous said...

Parule kharach khup chaan gaav ahe mala maaj gaav khup avadat

Waman Parulekar said...

ho kharach aahe sukanya. Malahi Parule gav khup aawadat.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...